नागपुरच्या दक्षिण पूर्वेस 82 कि.मी.अंतरावरील पवनी हे भंडारा जिल्ह्य़ातील एक महत्वपूर्ण तालुका मुख्यालय आहे. वैनगंगा नदी काठावर बाजुनी हे नगर आहे. पवनी विश्व विद्यापीठ होते. पवनी ला पवन राजा चे शासन होते . त्यांचा नावावर हे पवनी नाव दिले आहे.

पवनी येथील स्तूप आणि शिलालेख :

पवनी येथे खालील स्तूप आणि शिलालेख सापडलेले आहेत-

  1. जगन्नाथ टेकडी, स्तूप
  2. चांडकापुर टेकडी, स्तूप ( सुलेमान टेकडी) या नावानेपण ओळखले जाते.
  3. हरदोला टेकडी, स्तूप
  4. मौर्यकालीन सम्राट अशोकाचे शिलालेख (जगन्नाथ, टेकडी अगदी बाजुला)
  5. बुध्द धम्मा ग्रंथा बद्दल माहिती देणारे एक शिलालेख मिळते- पंच निकाय

पवनी येथील उत्खनन :

सर्व प्रथम 1887 मध्ये जॉन मार्शल, हरग्रेव्हस,सर कनिंगघम यानी येथील प्राचीनतत्वाची नोंद घेतली. 1935 मध्ये पवनी येथील हरदोलाला टेकडी जवळ मिळालेल्या शिलालेख प्राप्ती नंतर पवनीचा बौध्द वारसा पुढे येण्यास मदत झाली.

1969 मधे जगन्नाथ टेकडी जवळ शेती नांगरताना तिथे यक्ष मुद्रां प्रतिमा सोबत शिलालेख असलेल्या बौध्द स्तूपाच्या वेदिका स्तंभा ची सुध्दा प्राप्ती झाली. या नंतर 1969-1970 मध्ये नागपुर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृति व पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नागपुर येथील उत्खनन करिता तीन टेकड्यांची निवड केली.  ज्यामध्ये जगन्नाथ टेकडी, चांडकापुर टेकडी आणि हरदोलाला टेकडी यांचा समावेश होता.

जगन्नाथ टेकडी , स्तूप :

पवनी मध्ये प्रवेश करताना उजव्या भागास म्हणजे पवनीच्या दक्षिणेस असलेल्या बालसमुद्राच्या दक्षिण काठावर गोलाकार आकाराचे जगन्नाथ मंदिर म्हणजेच जगन्नाथ टेकडी आहे. टेकडी वरचा भाग सपाट करून त्यावर या शतकातील मंदिर बांधले, ते जगन्नाथ मंदिर नसुन तिथे महास्तूप होते.  त्या बाजुनी शिलालेख पडले आहेत. येथील उत्खननाने खरे म्हणजे स्तूपाला उजेडात आणले . सम्राट अशोकाच्या काळात हा स्तूप बांधलेला होता असे विद्वानांचे मत आहे.  कारण ज्या पध्दतीचे  ईतर स्तूप अशोक राजाचे मिळाले त्या पध्दतीचाच हा स्तूप होता. या काळात भाजलेले विटा व  मातीमध्ये उडदाची डाळ, मध व गहुचे पिठ पण टाकत होते. हे टाकले की मातीला चिकटपणा राहत होता. त्यावेळेस हे सर्व साहित्य स्तूपाच्या बांधकामात वापरत होते.

जगन्नाथ मंदिर चा बाजुनी सम्राट अशोकाचे धम्मलिपिमधे लिहलेले शिलालेख  पडलेले आहेत. त्या ठिकाणी संरक्षण करून ते शिलालेख ठेवले पाहिजेत.

उपासिकाय विसीमिताय दानं पुसगुतस वछियाच पसादो

उपासिका विशमित्रानी स्तंभ दान दिले.

एक गृहपतिनी पुशगुतस नावाचाही व्हरांडा बांधुन दान दिले.

हे दोन शिलालेख ओळखु शकतो पण बाकी ची खुप अवस्था खराब होत आहे.

जगन्नाथ टेकडी बाजुनी सर्व शिलालेख सापडले. काही अजब बंगला नागपूरला ठेवण्यात आले आहे.

अजब बंगला येथे हा शिलालेख

ठेवण्यात आला आहे

जगन्नाथ टेकडी हे विहार होते. शिलालेखाचा तिथे उत्खननातून मिळालेत्याचा पुरावा आहे की ते महास्तूप होते.

चांडकापुर टेकडी, स्तूप :

चांडकापुर टेकडीला सुलेमान टेकडी म्हटल्या जाते. चांडकापुर टेकडी पवनी दक्षिणेस दोन किलो मीटरच्या अंतरावर आहे. या टेकडीच्या उत्खननात एक मोठे स्तूप अवशेष उघडकीस आले. त्या एका भाडंयामध्ये मानवी हाडांचे व दाताचेअवशेष मिळालेआहेत. त्यावर लाकडाचे छत्र पण होते. ते अर्हत भिक्खु किवा भिक्खुणीचे आहेत. तिथे तोरण किवा शिल्पे नाही मिळाले.  तिथे सातवाहन राजा सातकरणी व क्षत्रपांची काही नाणी प्राप्त झाली. त्या मुळे यावरुन या स्तूपा चा काळ इ.स.पुर्व पहिले शतक ते इ.स दुसरे शतक असा ठरविता येतो.

हरदोला टेकडी, स्तूप :

पवनी उत्त र-पश्चिमेस हरदोलाला टेकडी नावाचे संरक्षित स्मारक आहे. या स्तूप टेकडीची उंची आठ मीटर आहे. हा स्तूप मातीचा मिळाला होता. उत्खननाच्या पुराव्यावरून पवनी हे विदर्भातील थेरवाद बौध्द धम्माचे केंद्र होते असे स्पष्ट होते. पवनी येथील प्राचीन बौद्ध संघाची माहिती प्राप्त होते.

पाली साहित्या विषयी माहिती :

जगन्नाथ टेकडीच्या स्तूपातील एका शिलालेखामध्ये नागसपचनिकायिस असे लिपिबध्द वाक्य आहे.

नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये ‘हत्ती’ , ‘नाग’,’श्रेष्ठ’,‘पुरुष’ असे होतो. पचनिकायिस म्हणजे- सुत्तपिटकाचे पाच भाग आहेत-

  1. दीघनिकाय,
  2. मझिजमनिकाय
  3. संयुक्त निकाय
  4. अंगुत्तरनिकाय
  5. खुद्दकनिकाय

नागासपचनिकायिस म्हणजे पाच निकायाचे ज्ञाण असणारा.

पवनी येथील संशोधन :

1994 मध्येभारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नागपुर येथील उत्खनन शाखेने डॉ. अमरेंद्ररनाथ याच्या मार्गदर्शना खाली पवनी येथील विविध स्थळी  केलेल्या उत्खननात एकून पाच कालखंड प्राप्त झाले. प्राचीन काळखंडात पहिला मौर्य पुर्व, दुसरा मौर्य, तिसरा शुंग, चौथा सातवाहन आणि पाचवा वाकाटक प्रमुख आहेत. या प्रकारे मौर्यपुर्व काळापासून मध्य पुर्व काळापर्यंत पवनी येथे सतत वस्ती  राहिली असे स्पष्ट होते. इ.स तिसऱ्या शतकात येथे थेरवाद स्थापत्यावशेषाचा  प्रभाव पडला होता. .शिवाय येथे महायान काळातील कुठलेही अवशेष प्राप्त झाले नाही.

सातवाहन कालीन
धम्मलिपी

A.S.I (पुरातत्व सर्वेऑफ इंडिया), अन्यत्र ॲन्युअल रिपोर्ट, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक यामध्ये पवनी मधील उत्खनन आणि संशोधनाविषयी माहिती आलेली आहे. पवनी मध्ये नागपुरचे डॉ. जगत जोशी व डॉ. डॉ. शांताराम भालचंद्र देव  1969-70 (पवनी एस्कॅव्हेशन), 1972 ढवळीकर सर, बी.जी गोखलेसर पुरातत्व विभागाने काम पाहिले. विदर्भातील बुद्ध धम्माचा इतिहास(बुध्दीजम इन महाराष्ट्र ) नागपुर 1993 मध्ये याविषयी माहिती आलेली आहे.

त्याचप्रकारे अनेक विद्वानांनी पवनी विषयी संशोधन केलेले आहे, संशोधन पेपर लिहिलेले आहेत.

 

 

 

 

 

One thought on “विदर्भातील प्राचीन बौद्ध स्थळ-पवनी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *