प्रस्तावना 

भगवान बुध्दांना बोधीवृक्षाखाली  अतिशय चिंतन मनन करुन ज्ञान प्राप्ती झाली  व ते सम्यक सम्बुद्ध  झाले . वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या ज्ञानांचे त्यांनी प्रथम धम्म देसना  पञ्चवग्गिय भिक्खुसमोर सारनाथ येथे दिली. हेच प्रथम धम्मचक्क पवत्तन होय.

त्यांना चार आर्य सत्ये, प्रतीत्यसमुत्पाद आर्य अष्टांगिक मार्ग इ. चा शोध लागला म्हणजेच ज्ञान  प्राप्त झाले. त्याचे त्यांनी चिंतन मनन केले. तेथेच बसुन (बोधीवृक्षाखाली ) त्यांनी सात आठवडे विमुक्ती सुखाचा आनंद घेतला.

तथागत बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये चार आर्य सत्याचे महत्वपूर्ण स्थान आहे .

ही चार आर्य सत्ये पुढीलप्रमाणे :-

(१) जगात दु:आहे – हे प्रथम आर्य सत्य

जगात सर्वत्र आढळणाऱ्या दु:खाला महासतिपट्ठान सुत्तात   सागींतले आहे. जन्म दु:ख आहे, वार्धक्य दु:ख आहे. प्रिय व्यक्ती चा वियोग, अप्रियांचा संग हे दु:ख आहे. इच्छा पूर्ती न होणे, हे पण दु:ख आहे. संक्षेपाने  पञ्च उपादान स्कंध हे दु:ख आहे. मानवी जीवनातील या दु:खाची विभागणी तिन भागांत केली आहे…

(१) दु:ख दु:खता

(२) संस्कार दु:खता

(३) विपरीणाम दु:खता

* दु:दु:खता—

हे सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक दु:ख होय.

*संस्कार दु:खता—

हे आपल्या वरील संस्कारामुळे उदभवणारे दु:ख  होय. देवदत्त सुत्तात  भगवान बुध्दानी उदाहरण दिले आहे की , सुंदर प्रेयसीने पर पुरुषाशी हंसुन बोलणे , वागणे हे आपल्या संस्काराप्रमाणे क्लेष व दु:खकारक  ठरते

*विपरीणाम दु:खता—

अपयशामुळे, निराशेमुळे उदभवणारे दु:ख होय.

अशाप्रकारे जगतातील दु:खा बद्दल भगवान बुध्द सांगतात .

(२) दु:समुदय- हे दुसरे आर्य सत्य

जगातील दु:खाच्या निर्मितीला कारण आहे. दु:खाचे मुळ असणे याला कारण आहे. ते कारण म्हणजे तृष्णा होय बुध्द महासतिपट्ठान सुत्तात  म्हणतात –

 पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ विकारयुक्त असलेली ,अनेक विषयात रमणारी ही तृष्णा  होय.

ही तिन प्रकारची असते-

(१)काम तृष्णा

(२) भव तृष्णा

(३)विभव तृष्णा

*काम तृष्णा:-

यांत लैगिंक सुखाबरोबर षडयंत्राद्वारे इंद्रीय सुख प्राप्त करण्याची प्रबळ उर्मी येते.ती शमन न होता उत्तरोउत्तर वाढत जाते व अधिक दु:खाचे कारण बनते.

*भव तृष्णा :-

ही लोभातुन उद्भवते. भौतिक वस्तुंचा अधिकाधिक संग्रह व प्रसिद्धी वर्चस्व मधुन भव तृष्णा उद्भवत असते

*विभव तृष्णा:-

ही इतर तृष्णा पेक्षा मोठी असते.  पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची लालसा असणे, अलाभ,भय,  इच्छा माणसात निराशा, न्युनगंड निर्माण करते व दु:खाचे कारण बनते.

ही दु:खाची कारणे  पुढीलप्रमाणे आहेत –

(१) वैयक्तिक

(२) सामुदायिक (अस्पृश्यतेमुळे)

(३) नैसर्गिक (पुर, भुंकप, वादळे. ई)

(३) दु:निरोध – हे तीसरे आर्य सत्य

हे दु:खी माणसाला आशावाद दाखविते. दुसऱ्या आर्य सत्यात जी दु:खाची कारणे सांगितली आहेत त्यामुळे दु:ख निर्माण होते म्हणुन हे परिणाम नको असतील तर त्याची कारणे नष्ट करुन दु:खाचा क्षय करता येतो , दु:ख टाळतां येते हा तर्क म्हणजे दु:ख निरोध नावाचे तिसरे आर्य सत्य भगवान बुध्दानी सागींतले आहे. हाच आशावाद होय.

(४) दु:ख निरोध गामिनी पटिपदा चवथे आर्य सत्य

तिसऱ्या आर्य सत्यात सांगितल्या प्रमाणे आशावादी सुत्राचे व्यवहारीक प्रात्यक्षिक म्हणजे चवथे आर्य सत्य होय. दु:खाचे निरोध (दु:खमुक्त ) करण्यासाठी बुध्दानी मध्यम मार्ग सांगितला आहे. अति भौतिक सुख किंवा अति तप (त्याग) हे दोन्ही टोकांचे मार्ग न अवलंबिता मध्यम मार्गाने दु:खाचा नाश करणे होय. बुध्द म्हणतात जीवनाचे आठही अंग मध्यम मार्गाने चाला  व दु:खमुक्त जीवन जगा.

हा मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय.  हा मार्ग प्रज्ञा, शिल, समाधि वर आधारीत असुन ह्याचे तिन भागांत वर्गीकरण केले आहे-

प्रज्ञा –

  • सम्यक दृष्टि,
  • सम्यक संकल्प

शील-

  • सम्यक वाचा,
  • सम्यक कर्मांत
  • सम्यक आजीविका

समाधि-

  • सम्यक व्यायाम
  • सम्यक स्मृती,
  • सम्यक समाधि

निष्कर्ष :

अशाप्रकारे हे चार आर्य सत्य जीवनाला सुंदर, सुखमय व मधुर बनविण्याचा सिध्दांत होय. जीवनात दु:ख आहे ह्या सत्याचा स्वीकार करणे होय. जर हे सत्यच स्विकारणार नाही तर ते सुधारणार कसे ?दु:खाचा स्वीकार हे ते नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. दु:ख आहे हे मान्य केले नाही तर हे दु:ख कमी होणारं नाही  पण मान्य केले तर ते नष्ट करण्याचा मार्ग शोधता येतो. कारण अनित्यतेचा सिध्दांत दु:ख अनंत आहे हे मान्य करीत नाही अनंत काहीच नाही. सनातन काहीच नाही. तर दु:ख ही  नष्ट होऊ शकते ते आर्य अष्टांगिक मार्गाने … ते म्हणजे-

  • सम्यक दृष्टि,
  • सम्यक सकंल्प,
  • सम्यक  वाचा,
  • सम्यक कर्मांत
  • सम्यक आजीविका,
  • सम्यक व्यायाम,
  • सम्यक स्मृती ,
  • सम्यक समाधी

हे होय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *