मनसर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर रामटेक तालुक्याच्या अंतर्गत येते. मनसर हे बौद्ध भिक्खूंचे महामंडळ, विद्यापीठ होते.
बौध्द भिक्खू हे अशा ठिकाणी निवास करित असत जिथे जवळ पाण्याचे स्रोत आहे, असे ठिकाण जिथुन चारिका करण्यासाठी जवळपास गाव किंवा नगर असेल, जे गावापासून जास्त दूरपण नाही आणि जवळ पण नाही. एकदम शांत निसर्गरम्य परिसरात धम्माचे अध्ययन करित असत. मनसर हे असेच एक प्राचीन बौद्ध अध्ययनाचे केंद्र होते.
जे नेहमी होते तेच मनसर येथील बौद्ध विरासत सोबत झालेले आहे. येथील स्तूपाला राजवाडा आहे असा खोडसाळ प्रचार केला गेलेला आहे, तो चुकीचा प्रचार आहे. स्तूपावरून त्याचे प्रकार व त्याची रचना, त्याच्या काळ ओळखता येऊ शकतो. स्तूप व बौध्द संस्कृती चे अभ्यासक जे असतील त्यांच्या निदर्शनास ही बाब येणार. येथे विहार आहेत याचे पुरावे आहेत. त्याला अष्टकोणी विहार म्हटल जाते.
हि हिडिंबा टेकडी आहे. वरच्या भागात अस्थी स्तूप आहे . त्याच्या आत दयनीय अवस्थेत स्तूप आहे.
प्राचीन बौध्द विद्यापीठ- मनसर :
मनसर हे एक प्राचीन बौध्द विहार आहे, मंडळ ( विद्यापीठ) आहे. मनसर हे प्राचीन बौध्द विद्यापीठ आहे. राजवाडा आहे चुकीचा घोषित केला होता. कारण राजवाड्यात दरबार (हाॅल) असतो. परंतु येथे मंत्र्यांसह, नोकरा करिता राहणारी व्यवस्था लक्षात येत नाही . ईथे लहान खोल्या आहेत, संरक्षण भिंती आहेत. प्रदक्षिणा करिता, चंक्रमणा करिता वाट आज पण दिसते. स्तूप ला वेदिका,वेदिका पट्टी दिसते जे स्तूपा बांधकामात विशेष महत्वाचे आहे.
A.S.I. ने उत्खनना नंतर ते प्राचीन बौध्द विद्यापीठ घोषित केले आहे. हे स्तूप व बौध्द विद्यापीठ अशोककालीन आहे. त्याचा पुरावा उत्खननात मिळालेल्या धम्मलिपि मधे लिखित शिलालेख आहेत . प्राचीन विद्यापीठ म्हणून याची नोंद झाली आहे . त्याचप्रकारे याठिकाणी उत्खनन झाले तर आणखी महत्वपूर्ण माहिती मिळु शकतेअसे A.S.I. ने आपल्या रिपोर्ट मधे नोंदीत केले आहे.
सौजन्य :
प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , नागपूर आणि विदर्भ संशोधन मंडळ यांच्या संशोधना मुळेच आपल्याला ही बहुमूल्य माहिती प्राप्त झालेली आहे.
प्राचीन काळात चीन व इतरही देशातील यात्रेकरू आपल्या देशात बौद्ध धम्माचे अध्ययन करण्यासाठी येत होते . वर्तमानकाळात देखील ही परंपरा कायम असलेली दिसून येते. डॉ लेले हाँग (चायना ) या मनसर येथे अध्ययन दौरा करीत असलेले दिसून येत आहे .
हा आपला प्राचीन बौद्ध वारसा आहे, त्याचे जतन आपणास करावे लागेल. त्याचा अभ्यास सुध्दा आपणास करावा लागेल. अभ्यास केल्याने त्यातून प्रत्येकाला वेगळी दृष्टी निर्माण होईल . त्यामुळेच तर बौद्ध कला आणि वास्तुशिल्प ज्ञानाचा विस्तार होतो.