पाली भाषा आणि साहित्याचे महत्व

पाली भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे, त्याचप्रकारे विश्वाच्या ब्रृहद साहित्य भांडारात पाली साहित्याचा समावेश होतो.पाली साहित्य तिपिटक साहित्य, अट्ठकथा साहित्य, व्याकरण साहित्य, कोश साहित्य, टीका साहित्य, अनुटीका साहित्य इ. साहित्य प्रकारात विभाजीत आहे. याच प्रकारे वंस साहित्य देखील पाली साहित्याचा भाग आहे. पाली साहित्याचे महत्व फक्त धार्मिक दुष्टीकोनातुनच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक व ऐतिहासिक दुष्टीकोनातुन देखील आहे. पाली साहित्य भारतातील प्राचीन साहित्याच्या अंतर्गत समाविष्ठ होते. त्यामुळे निश्चितच पाली साहित्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.

पाली साहित्याचे प्रारंभिक स्रोत

पाली साहित्याचा उगम भगवान बुद्धाद्वारे झालेला आहे. भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्तीपासुन तर महापरिनिब्बाणापर्यंत सतत पंचेचाळीस वर्षापर्यंत धम्मोपदेस देत होते. भगवान बुद्धाच्या उपदेश अर्थात बुद्धवचनाचा क्रमिक विकास होत गेला. तसेच हेच बुद्धवचन साहित्यीक स्वरूपात तिपिटकाच्या रूपात आज उपलब्ध आहेत. तिपिटकाला आज देखील बुद्धवचन म्हटले जाते आणि हया बुद्धवचनाचे प्रारंभिक स्रोत भगवान बुद्ध च आहेत.
भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर विविध प्रसंगी, विविध लोकांना जो उपदेश दिला त्याद्वारे पाली तिपिटक साहित्याची निर्मिती झालेली आहे. पाली भाषेचे अस्तीत्व भगवान बुद्धापुर्वी देखील असावे. परंतु या भाषेत साहित्य निर्मितीची प्रक्रियेचा प्रारंभ भगवान बुद्धाद्वारे झालेला आहे. बुद्धवाणी, बुद्धवचन संकलीत होऊन त्याद्वारे पाली तिपिटक साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्यामुळेच बुद्धवाणी, बुद्धवचनाचे प्रणेता भगवान बुद्ध आहेत. पालि तिपिटक साहित्याचे आदि स्रोत भगवान बुद्धच आहेत.

पाली साहित्याचे प्रारंभिक स्वरूप

बुद्धवाणी चे विकसीत स्वरूप पाली तिपिटक साहित्य आहे. परंतु प्रारंभिक अवस्थेत तिपिटक साहित्याचे स्वरूप तसे नव्हते जसे ते वर्तमानात उपलब्ध आहे. सर्वप्रथम समग्र बुद्धवचन अथवा बुद्धवाणी नवांग बुद्धशासनामध्ये विभाजीत होती.

सुत्त  गेय्यं वेय्याकरणं गाथुदानिकवुत्तकं,

जातकब्भुतवेदल्लं नवङ्र सत्थुसासनं।।1

या नवांग बुद्धशासन अर्थात शास्त्याच्या शासनात सुत्त, गेय्य, व्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अद्भुत धम्म, वेदल्ल  यांचा अंर्तभाव होतो.

नवांग बुद्धशासनाचे विश्लेषण

गंधवंसामध्ये नवांग बुद्धशासनामध्ये तिपिटकाचे विभाजन करून मांडण्यात आलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे-

1.सुत्त

सुत्त म्हणजे बुद्धोपदेस होय. ’

तत्थ उभतोविभड्.निद्देसे, खन्धक – परिवारा, सुत्तनिपाते मड्.लसुत्तं, रतनसुत्तं नालकसुत्तं तुवटकसुत्तानि अञ्ञं

पि सुत्तनामकं तथागतवचन सुत्तं ति वेदितब्बं।2

2.गेय्य-

गेय्य म्हणजे गातायेण्यासारखा भाग होय.

सब्बं पि सगाथकं गेय्य ति वेदितब्बं ति।3

3.वेय्याकरण-

वेय्याकरण म्हणजे व्याख्या होय.

सकलं अभिधम्मपिटकं, निगाथकं सुत्तं  च, यं च अञ्ञं पि अट्ठहि अङ्रेहि असंगहितं बुद्धवचनं तं बुद्धवचनं वेय्याकरणं वेदितब्बं।4

4.गाथा-

दोन पंक्तिच्या छन्दविशेषाला गाथा म्हणतात.

धम्मपद, थेरगाथा, थेरीगाथा, सुत्तनिपाते नोसुत्तनामिका सुध्दिकगाथा च गाथा ति वेदितब्बा।5

5.उदान-

उदान हा शब्द उल्हासपुर्ण कथन सुचित करतो.

सोमनस्स ञाणमयिक गाथापटिसंयुत्ता द्वे असीतिसुत्तन्ता उदानं ति वेदितब्बं ति।6

6.इतिवुत्तक-

भगवान बुद्धाद्वारे ’हे म्हटल्या गेलेले आहे’ हा अर्थ इतिवुत्तक स्पष्ट करतो.

’वुत्तं  हि एवं भगवता’ ति आदिनयपवत्तो द्वादसुत्तरसतसुत्तन्ता इतिवुत्तकं ति वेदितब्बा।7

7.जातक –

जन्मासंबंधीच्या कथांना जातक म्हणतात.

अपण्णकजातकादीनि पण्णासाधिकानि प´चजातकसतानि जातकं ति वेदितब्बा।8

8.अब्भुतधम्म-

अब्भुतधम्म म्हणजे आश्चर्यकारक-प्रकरण होय.

चत्तारो मे, भिक्खवे, अच्छारिया-अब्भुतधम्मपटिसंयुत्ता सुत्तनता अब्भुतधम्मं ति वेदितब्बं।9

9.वेदल्ल

वेद म्हणजे धार्मिक भावना, अनुभूति होय. ’वेद’ ला ’ल’ प्रत्यय लागुन ’वेदल्ल’ होतो.

चुल्लवेदल्ल-महावेदल्ल-सम्मादिट्ठि-सक्कप´ह-संखारभाजनीय-महापुण्णमसुत्तन्तादयो सब्बे पि वेदं च तुट्ठिं च लध्दा लध्दा पुच्छितसुत्तन्ता वेदल्लं ति वेदितब्ब।10

पाली भाषा व साहित्य दोन्ही दुष्टीकाणातुन अत्यंत महत्वपुर्ण आहे. आधुनीक भाषांवर देखील पाली भाषेचा स्पष्ट प्रभाव दिसुन पडतो.प्रस्तुत लेखात पाली साहित्याचे प्रारंभिक स्रोत आणि स्वरूप याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे.

 

संदर्भ ग्रंथ सूची

1. सिंह डाॅ.परमानन्द संपा, दीपवंस, बौद्ध आकर गं्रथमाला, वाराणसी 1996, गाथा क्र.20, पृ.क्र.58.
2. कुमार, डाॅ.बिमलेंद्र संपा, गंधवसो, इस्टर्न बुक लिंकर्स, दिल्ली, प्र.1992, पृ.क्र.3-4.
3. तेच पृ.क्र.4
4. तेच
5. तेच
6. तेच
7. तेच
8. तेच
9. तेच
10. तेच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *