प्रस्तावना :

‘पाली साहित्याचा विकासाचा इतिहास’ या संबंधी विवेचन या लेखात करण्यात येत आहे. पाली भाषेने भगवान बुद्धाचे संदेश वहन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. बुद्धवाणी, बुद्धवचनाद्वारे पाली साहित्याची क्रमशःनिर्मि ती झालेली आहे. बुद्धवाणी नवांग बुद्धशासनामध्ये प्रथम स्वरूपामध्ये विभाजित होती. तिसऱ्या संगीतिमध्ये तिपिकाचे संपुर्ण स्वरूप तयार झाले. परंतु तिपिटकाचे हे स्वरूप मौखिकरूपात होते. सिंहलमध्ये इ.स. पुर्व पहिल्या शतकामध्ये तिपिटक साहित्याला लिपीबद्ध करण्यात आले. इ.स.पुर्व पहिल्या शतकामध्ये अट्ठकथा साहित्याचा देखील विकास झाला होता व हे अट्ठकथा साहित्य देखील मौखीक स्वरूपाचे होते. सिंहल मध्ये तिपिटक साहित्यासोबतच अट्ठकथा साहित्य देखील लिपीबद्ध करण्यात आले होते. थेरवाद हाच मुळ बौद्ध संप्रदाय आहे त्याचप्रकारे पाली साहित्य हे मुळ बुद्धवचन आहेत. मुळ बुद्धवचनामध्ये पुर्णतः परीवर्तन करून महासांघिक संप्रदायाने आपल्या साहित्याची निर्मि ती केली. पाली भाषेत लिखित तिपिटक साहित्य हेच मुळ बुद्धवचन आहे याची पुष्टी दीपवंस ग्रंथ करतो. त्याचप्रकारे बौद्ध संप्रदायात आलेल्या सैद्धांतिक व साहित्यिक परीवर्तनाला दीपवंस ग्रंथ प्रकट करते. पाली साहित्याचे जतन व संवर्धन शतकानुशतके आचार्य शिष्य परंपरेद्वारे झालेले आहे .

आचार्य-शिष्य परंपरा :

पाली साहित्याचा उगम भगवा बुद्ध यांच्यापासुन झालेला आहे . त्यानंतर-
1. स्थविर उपालि
2. स्थविर दासक
3. स्थविर सोणक
4. स्थविर सिग्गव
5. स्थविर मोग्गलिपुत्ततिस्स
6. स्थविर महिन्द

पर्यंतची आचार्य-शिष्य परंपरा दीपवंसामध्ये नमुद करण्यात आलेली आहे.

त्याचप्रकारे या ग्रंथामध्ये भारत व सिंहलमधील भिक्खु व भिक्खुनि संघाच्या शिक्षापद्धतिविषयी देखील महत्वपूर्ण माहिती प्रदान करण्यात आलेली आहे. बौद्ध साहित्यात भिक्खुनिंच्या अध्ययन केंद्राविषयी माहिती सहसा आढळुन येत नाही. मात्र या ग्रंथाच्या अध्ययनाद्वारे या ज्ञानात भर पडते. दीपवंसाद्वारे अनुराधपुर हे भिक्खुनिंचे अध्ययन केंद्र म्हणुन विकसीत होत होते ही महत्वपूर्ण माहिती प्राप्त होते.

भगवंताद्वारे उपदेशीत धम्म आणि विनयाचे विभिन्न संगीतिद्वारे संकलन करून पाली साहित्याची निर्मिती झाली. पाली साहित्यातील सुत्त हे प्रत्येक काळात बुद्धवाणी, बुद्धोपदेशा प्रमाणे मार्गदर्शकाचे कार्य करतात. सम्राट असोकालादेखील बौद्ध धम्माकडे आकर्षित करण्याचे कार्य पाली साहित्याच्या महत्वपुर्ण सुत्ताने केलेले आहे. वेहास, अपरान्त, महारट्ठ, यवनक प्रदेश त्याच प्रकारे सिंहलमध्ये बौद्धधम्माचा प्रचार-प्रसार करण्यात पाली साहित्यामधील महत्वपुर्ण सुत्ताचे योगदान राहिलेले आहे.

या संबंधीचे विस्तृत विवेचन या लेखा मध्ये करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *