प्रस्तावना :

पाली साहित्याला विशाल साहित्य संपदा लाभलेली आहे . धम्मपद या विशाल साहित्य संपदेतील ग्रंथ आहे.धम्मपद ग्रंथाविषयी चर्चा प्रस्तुत लेखात करण्यात आलेली आहे .

धम्मपदा चा अर्थ :

धम्मपद हा शब्द ‘धम्म‘ आणि ‘पद’ या दोन शब्दांनी तयार झाला आहे. ‘धम्मपदा  चा व्युत्पत्तिगत अर्थ आहे  धम्म विषयक  शब्द, पंक्ति किंवा  पद्यात्मक वचन’.

पाली साहित्यात धम्मपदाचे स्थान :

धम्मपदाचा समावेश खुद्दकनिकायाचा अंतर्गत होतो. खुद्दकनिकायात पंधरा ग्रंथाचा समावेश होतो . धम्मपद हा खुद्दकनिकायाचा पाचव्या क्रमांकाचा ग्रंथ आहे.

धम्मपदाची विषयवस्तू :

धम्मपद यमक, अप्पमाद, चित्त आदि 26 वग्गों (वर्गों) मधे  वर्गीकृत  आणि 423 गाथांमध्ये विभक्त आहे .साधारणतः वग्गाच्या विषयानुसार गाथांचा समावेश करण्यात आले आहे .
जसे –चित्तवग्गात पुढील गाथेचा समावेश होतो.

फन्दनं चपलं चित्तं,

दूरक्खं दुन्‍निवारयं।

उजुं करोति मेधावी,

उसुकारोव तेजनं॥

आणि पण्डित वग्गात या गाथेचा समावेश होतो.

सेलो यथा एकघनो ,

वातेन न समीरति।

एवं निन्दापसंसासु,

न समिञ्‍जन्ति पण्डिता॥

धम्मपदाची भाषाशैली :

न हि वेरेन वेरानि,

सम्मन्तीध कुदाचनं।

अवेरेन च सम्मन्ति,

एस धम्मो सनन्तनो॥

आणि

यो च गाथा सतं भासे,

अनत्थपदसंहिता।

एकं धम्मपदं सेय्यो,

यं सुत्वा उपसम्मति॥

या गाथा धम्मपदा आढळतात. धम्मपद  गाथामय ग्रंथ आहे.

धम्मपदाचे महत्व :

धम्मपद बौद्ध साहित्यातील  सर्वोत्कृष्ट लोकप्रिय ग्रंथ आहे’. बौद्ध संघात  या ग्रंथाचा  खूप  प्रभाव आहे,  यात पारंगत झाल्या शिवाय  श्रीलंकेत  कोणत्याही भिक्खूला   उपसंपदा प्रदान केली जात नाही.

धम्मपदातील नीतिबोध :

नैतिक मूल्यांनी परिपूर्ण अशा धम्मपदाच्या गाथा आहेत.

अभिवादनसीलिस्स,

निच्‍चं वुड्ढापचायिनो ।

चत्तारो धम्मा वड्ढन्ति,

आयु वण्णो सुखं बलं॥

अर्थात  जो अभिवादनशील आहे, जो सदा वृद्धांची सेवा  करतो त्याच्या आयु , वर्ण , सुख आणि बल या चार गोष्टी वाढतात.

पापञ्‍चे पुरिसो कयिरा,

न नं कयिरा पुनप्पुनं।

न तम्हि छन्दं कयिराथ,

दुक्खो पापस्स उच्‍चयो॥

अर्थात मनुष्याने जर पाप कर्म केले तर ते वारंवार करू नये. त्याचा (पापाचा) छंद घेऊ नये.
पापाचा संग्रह दुःखदायक आहे.

पुञ्‍ञञ्‍चे पुरिसो कयिरा,

कयिरा नं पुनप्पुनं।

तम्हि छन्दं कयिराथ,

सुखो पुञ्‍ञस्स उच्‍चयो॥

अर्थात मनुष्याने जर पुण्य कर्म केले तर ते वारंवार. त्याचा (पुण्याचा) छंद घ्यावा . पुण्याचा समुच्चय सुखदायक आहे.

धम्मपदातील गाथा कुशल कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि अकुशल कर्म करण्यापासुन परावृत्त करणारे आहेत.

वर्तमानात धम्मपद ग्रंथाची उपयुक्तता :

धम्मपदाच्या गाथांना ऐकून संसाराच्या पुष्कळ दुःखी मनुष्यांचा उद्धार झाला आहे. आजच्या या अशांत वातावरणात या ग्रंथाचा प्रचार फारच  आवश्यक आहे .

सहस्समपि चे वाचा,

अनत्थपदसंहिता।

एकं अत्थपदं सेय्यो,

यं सुत्वा उपसम्मति॥

अर्थात अनर्थकारी हजार वचनापेक्षा एक अर्थकारी पद श्रेष्ठ आहे जे ऐकून (मनुष्य) शांत होतो.

याचा जितका प्रचार होणार तितकाच मानव जगताचा कल्याण होणार . निश्चितच धम्मपद या ग्रंथाच्या अध्ययनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *