परिचय :
लोकवग्गाचा समावेश धम्मपद या ग्रंथामधे कऱण्यातआलेला आहे. धम्मपद हा खुद्दकनिकायाचा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ आहे. लोकवग्ग हा धम्मपदातील २६ वग्गापैकी १३ वा वग्ग आहे व लोकवग्गात एकूण १२ गाथा आहेत.
कुशल कर्म करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गाथा :
लोकवग्गातील गाथा या कुशल कर्म करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आणि अकुशल कर्मापासून परावृत्त करणाऱ्या आहेत.
हीनं धम्मं न सेवेय्य,
पमादेन न संवसे।
मिच्छादिट्ठिं न सेवेय्य,
न सिया लोकवड्ढनो॥
यामधे भगवान बुद्धांनी पापकर्म करू नका, प्रमादात रत होऊ नका ,मिथ्याद्रुष्टी ठेऊ नका , आणि संसारातील आवागमन वाढवू नका असे उपदेश दिलेले आहे . त्याचप्रकारे
उत्तिट्ठे नप्पमज्जेय्य,
धम्मं सुचरितं चरे।
धम्मचारी सुखं सेति,
अस्मिं लोके परम्हि च॥
अर्थात….उठा आळशी न होता चांगल्याप्रकारे धम्माचे आचरण करा म्हणजे तुम्हाला या लोकांत आणि परलोकात सुखाने राहाता येईल, असे महत्वपूर्ण मार्गदर्शन देखील लोकवगात केलेले आहे.
जीवनाच्या वास्तविकतेचा परिचय :
जो या जगाला बुडबुड्या समान पाहातो, मृगजळासमान बघतो. त्याप्रमाणे जीवन असते. जो जीवनाच्या वास्तविकतेला जाणतो अश्यांना मृत्यु चे भय नसते.
जीवन हे आभासी आहे , एखाद्या श्रुगांरलेल्या राजरथाप्रमाने हे जग आहे.मुर्ख लोकांना हे कळत नाही, ते त्यात आसक्त होतात . ज्ञानी लोक मात्र त्यात आसक्त होत नाही .
तथागतांनी यात जीवनाची सार्थकता सांगीतली आहे .जीवनामधे प्रारंभी अनेक चुका होतात.नंतर सुज्ञ व्यक्ती ला जाणीव झाल्यावर, पश्चाताप झाल्यावर तो चुकांची दुरुस्ती करतो .
यो च पुब्बे पमज्जित्वा,
पच्छा सो नप्पमज्जति।
सोमं लोकं पभासेति,
अब्भा मुत्तोव चन्दिमा॥
अर्थात जो सुरवातीला चूका करून नंतर चूका करीत नाही ,तो ढगातून मुक्त चंद्रा प्रमाणे जगाला प्रकाशित करतो.
तसेच जो आधी पाप कर्म करतो अकुषल काम करतो पण नंतर तो कुषल कर्म करुन पाप कर्माला झाकुन टाकतो तो सुद्धा काळ्या कुट्ट ढगाच्या बाहेर पडणाऱ्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो.
यस्स पापं कतं कम्मं,
कुसलेन पिधीयति ।
सोमं लोकं पभासेति,
अब्भा मुत्तोव चन्दिमा॥
तसेच जो आधी पाप कर्म करतो, अकुशल कर्म करतो पण नंतर तो कुशल कर्म करुन पाप कर्माला झाकुन टाकतो तो ढगातून मुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो.
निब्बाण प्राप्ती करिता अग्रेसर करणाऱ्या गाथा :
या लोकात सर्वच लोक हे डोळस नसतात म्हणजेच सर्वच ज्ञानी नसतात .ईथे अज्ञानींना आंधळे म्हटले आहे.जे ज्ञानी लोक आहेत ते या संसाररुपी जाळातुन मुक्त होऊन सुगतीला प्राप्त करतात.
हंस पक्षी ज्याप्रमाणे आकाशात ऊडतो आणि आपले ध्येय साध्य करतो त्याचप्रमाणे मनुष्याने सर्व अडथळ्यांना दुर करुन ,माराला जिंकून निब्बानाला प्राप्त करावे .धर्यवान मनुष्य निब्बाणाला प्राप्त करतो .
पथब्या एकरज्जेन,
सग्गस्स गमनेन वा।
सब्बलोकाधिपच्चेन,
सोतापत्तिफलं वरं॥
संसारातील परमोच्च सर्व सुखापेक्षा स्रोतापत्तीचे फळ अधिक उत्कृष्ट आहे.
अशाप्रकारे लोकवग्गातील गाथा या निव्ब्बाणाच्या प्राप्तीकरिता अग्रेसर करणाऱ्या आहेत.
लोकवग्गातील नैतिक उपदेश :
जो व्यक्ती शीलाचे पालन करीत नाही, म्हणजेच खोटे बोलतो त्याला परलोकाची चिंता नाही .असा व्यक्ती कोणतेही पापकर्म करु शकतो तो निर्वानाला प्राप्त करू शकत नाही. याकरिता मनुष्याने शीलाचे पालन करावे .
कपटी आणि मूर्ख लोकांना दानाचे महत्व नसते.धैर्यवान आणि ज्ञानी मानुस जो कुशल कर्म करतो तो मात्र दानाचा पुरस्कार. असा शीलवान मनुष्य हा नेहमीच सुखी असतो.
धम्मपदातील लोकवग्गाचे महत्व :
लोकवग्गा मधे लोक म्हणजे संसाराच्या वास्तविकतेचा परिचय करून देण्यात आलेला आहे. संसारात अकुशल कर्म केल्याने , पाप कर्म केल्याने दुःख प्राप्त होते व सुखाचा मार्ग मिळत नाही. सुख प्राप्ती करिता चांगल्याप्रकारचे धम्माचरण करून धम्मचारी व्हावे, हे महत्वपूर्ण मार्गदर्शन लोकवग्गात देण्यात आलेले आहे .
मनुष्य आजन्म सुखप्राप्तीसाठी धडपड करीत असतो.
त्यादृष्टीने धम्मपदातील लोकवग्गाचे अध्ययन निश्चीतच महत्वपूर्ण आहे.
धम्मपदातील लोकवग्गचे अध्ययन हा महत्त्वपूर्ण विषय आपण अगदी सोप्या भाषेत लिहिले. त्यामूळे समजण्यास फार सोपे आहे. निब्बान प्राप्तीच्या गाथाही दिल्या असत्या तर वाचता आल्या असत्या.
धन्यवाद
Yes