एकविसाव्या शतकातील बौद्धधम्माचा आढावा घेतल्यास जगात ख्रिश्चन धर्मानंतर बौद्धधम्माचा द्वितीय क्रमांक लागतो. या संदर्भात काही मतभिन्नता देखील आढळुन येते. काहि सर्वेक्षण या मताचा पाठपुरवठा करतात की बौद्ध धम्म जगातील चवथ्या क्रमांकाचा धम्म आहे. विकिपिडीया या संके तस्थळाावर उपलब्ध माहिती नुसार-
“Buddhism is a religion practiced by an estimated 488 million in the world. 495 million or 535 million people as of the 2010. Representing 9% to 10% of the world’s total population.”
जगातील दोनशे पेक्षा अधिक देशात बौद्ध धम्माचे लोक आढळुन येतात. त्याचप्रकारे सिंहल (श्रीलंका), चीन, जापान, थाईलण्ड, भुतान व तिब्बत इत्यादी अठरा देशांमध्ये बौद्धधम्म प्रमुख धम्म आहे. असा हा बौद्धधम्म जगातील प्रथम धम्म आहे जो आपल्या उगम स्थापनापासुन जगात इतरत्र पसरला बौद्धधम्म भारताच्या सीमे बाहेर जगात एवढया व्यापक प्रमाणात कसा पसरला? यासंबधीचा मागोवा घेतल्यास त्याचदेखील समाधान बौद्ध इतिहास प्रस्तुत करणाऱ्या दीपवंस ग्रंथामध्ये आढळुन येते . धम्माचा प्रचार-प्रसार इतर देशामध्ये करण्यात संघाचे काय योगदान राहिलेले आहे? यासारख्या उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचे उत्तर देखील या ग्रंथामध्ये आढळुन येते. यासारख्या उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचे उत्तर देखील या ग्रंथामध्ये आढळुन येते. त्याचप्रकारे बौद्धधम्म आपल्या उगम स्थानापासुन इतरत्र पसरणारा धम्म कसा ठरला व यामध्ये संघाची भुमिका काय राहीलेली आहे. यासारख्या कित्येक शंकेचे निरसरण या ग्रंथाच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होते.
बौद्धधम्माचा प्रचार-प्रसार भारताच्याबाहेर संपुर्ण जगभर झालेला आहे. बौद्धधम्माचा प्रचार-प्रसार भारत व संपुर्ण जगभर करण्यात भिक्खु संघासमवेत भिक्खुनि संघाचे देखील महत्वपुर्ण योगदान राहिलेले आहे. दीपवंस ग्रंथामध्ये भिक्खुसंघासमवेत भिक्खुनि संघाच्या स्वरूपाविषयी माहिती आढळुन येते.
भिक्खु संघाचे –
1. सामणेर
2. भिक्खु
3. थेर
4. महाथेर
5. उपज्झापक
असे स्वरूप आढळुन येते.
मात्र भिक्खुनि संघाच्या स्वरूपाविषयी एवढी स्पष्ट माहिती आढळुन येत नाही. त्याचप्रकारे दीपववंस या ग्रंथामध्ये भारत व सिंहलमधील भिक्खु व भिक्खुनि संघाचा उदय व विकास याविषयी देखील महत्वपूर्ण माहिती प्रदान करण्यात आलेली आहे. भारतामध्ये भिक्खु संघ, उपासक संघ, उपासिका संघ, भिक्खुनि संघ या प्रकारे संघाचा क्रमशः विकास झालेला आढळुन येतो परंतु सिंहलमध्ये उपासक संघ, उपासिका संघ, भिक्खु संघ, भिक्खुनि संघ याप्रकारे संघाचा विकास झालेला आढळुन येतो. दीपवंस या ग्रंथाद्वारे विनयपिटकाचा संपुर्ण विकास झाल्यावर देखील काही संघाचे नियम कालानुरूप विकसीत होत होते ही देखील महत्वपूर्ण माहिती प्राप्त होते.
तृतिय संगीतिच्यानंतर बौद्धधम्म जगभर पसरविण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला होता. गन्धार, महिषमण्डल, वनवास, उपरान्तक, महारट्ठ, यवनकप्रदेश,
हिमालयाप्रदेश सुवण्णभुमी , सिंहल इत्यादी देशांमध्ये भिक्खुगणांना धम्मप्रचारार्थ पाठविण्यात आले. बौद्धधम्म आज जवळपास दोनशे देशांमध्ये पसरला आहे. तसेच
प्रामुख्याने आशयायी खंडात अधिक व्यापक प्रमाणात पसरलेला आहे. बौद्धधम्माला विश्वव्यापी बनविण्यात या संगीतिचे महत्वाचे योगदान राहिलेे आहे. तिसऱ्या
संगीतिमध्ये भारताच्या बाहेर भिक्खु गणांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला ज्याचे फलस्वरूप आज बौद्धधम्म जगातील सर्वच देशात पोहचल्याचे आढळुन येते. त्याचप्रकारे भारतीय भिक्खुनिसंघाने देखील सिंहलमध्ये महत्वपुर्ण योगदान दिलेले आढळुन येते. सिंहलमधील भिक्खु व भिक्खुनि संघाने देखील सिंहलमध्ये बौद्धधम्माच्या
प्रचार व प्रसारामध्ये महत्वपुर्ण योगदान दिलेले आहे. कुठलाही धम्म शतकानुशतके अक्षुण्ण राहण्यासाठी आवश्यक आहे की सातत्याने त्या धम्माचा प्रचार-प्रसार होत असला पाहिजे . सभेचे आयोजन होऊन त्यांच्यातील शंका प्रश्नाचे निरसरण झाले पाहीजे . त्याचप्रकारे धम्मप्रसारकांमध्ये देखील सम्मेलन आयोजीत व्हायला पाहिजे . बौद्ध धम्माच्या प्रसारार्थ संघानी उपरोक्त सर्व कार्य पार पाडलेली आहेत व या सर्व कार्यामध्ये भिक्खु संघ व भिक्खुनि संघानी उल्लेखनिय कार्ये केलेली आहेत. दीपवंसामध्ये भारतातील भिक्खु व भिक्खुनिच्या सम्मेलनाविषयी देखील उल्लेख आढळुन येतो. बौद्धधम्माच्या उत्थानाकरीता संघाने दिलेल्या वरील सर्व योगदानांची सविस्तर चर्चा दीपवंसामध्ये करण्यात आलेली आहे.