प्रस्तावना :

बौद्धधम्माचा उगम भारतात झालेला आहे. भारतीय राजांनी बौद्धधम्माला राजाश्रय प्रदान केलेला होता. त्यामुळेच बौद्धधम्म भारत व भारताबाहेर देखील पसरला होता. भारतीय राजांनी बौद्धधम्माला दिलेले योगदान बौद्धधम्माच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारतीय राजांच्या सहकार्यानेच बौद्ध धम्माचा प्रवेश सिंहलद्वीपामध्ये झाला. सिंहलदेशाच्या वर्तमान परिस्थतीचा विचार केल्यास आज या देशातील 70% पेक्षाही अधिक लोकसंख्या बौद्धधम्माचा अवलंब करणारी आहे. ज्या देशामध्ये बौद्ध धम्माचा कुठलाही परिचय नव्हता त्या देशामध्ये एवढे परिवर्तन कसे घडले व ते आजतागायत कसे स्थिर आहे. यासारख्या प्रश्नांचा अभ्यास करतांना देखील याची उत्तरे सिंहलच्या प्राचीन इतिहासामध्ये आढळुन येतात. सिंहलचा प्राचीन इतिहास संकलित करणारादीपवंस हा सर्वप्रथम ग्रंथ आहे. सिंहलच्या राजांनी बौद्धधम्माला दिलेल्या योगदानामुळे बौद्ध धम्माचा कुठलाही गंध नसणाऱ्या भुमीमध्ये बौद्धधम्म रूजला व पुढे झपाटयाने विकसीतझाला. त्याचप्रकारे ज्या भारतभुमीमध्ये बौद्ध धम्माचा उगम झाला वर्तमान परिस्थीती विचार केल्यास आज या देशातील फक्त 0.8ः%लोकसंख्या बौद्धधम्माचा अनुसरण करणारी आहे. निश्चितच सिंहलचा बौद्धधम्माचा आलेख भारतापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. सिंहलभुमीमध्ये बौद्धधम्मामध्ये घडुन आलेल्या या स्थिंतरांचे अध्ययन करण्यासाठी दीपवंस ग्रंथ मार्गदर्शक सिद्ध होतो. प्रत्येक सिंहली राजे बौद्धधम्मावलंबी होते. त्याचप्रकारे बौद्धधम्माप्रती त्यांची श्रद्धा,निष्ठा होती. बौद्धाम्माच्या उत्थानाकरीता त्यांनी सक्रिय योगदान दिलेले आहे. बौद्धधम्माचे पाळेमुळे सिंहलमध्ये घट्ट रोवल्या गेले व नंतर येणारे राजे देखील बौद्धधम्माला अनुकुल राहिलेले आहेत. त्यामुळेच सिंहलभुमीमध्ये बौद्धधम्म शतकानुशतके वृद्धींगत होत गेलेला आहे.

दीपवंसामधील राजांचा इतिहास :

दीपवंसामध्ये सिंहलद्विपामध्ये बौद्धधम्माचा प्रवेश, प्रचार, प्रसार यांच्या इतिहासाचे वर्णन आलेले आहे. त्याचप्रकारे भारतीय राजे व सिंहली राजे यांच्या राज्यकार्यकिर्दीचे व त्यांनी बौद्धधम्माच्या प्रचार-प्रसारासाठी दिलेल्या योगदानाचे देखील वर्णन आलेले आहे.

दीपवंसामध्ये वर्णित भारतीय राजे :

दीपवंसामध्ये –
1. बिंबिसार
2. अजातसत्तु
3. उदयभद्र
4. नागदासक
5. सुसुनाग
6. कालासोक
7. दसभातरो
8. चन्दगुत्त
9. बिंदुसार
10. असोक
इत्यादी भारतीय राजांच्या कार्यकिर्दीची माहिती आढळुन येते. परंतु सर्वाधिक महत्वपुर्ण माहिती सम्राट असोक यांच्या कार्यकिर्दी विषयी प्रदान करण्यातआलेली आहे.

दीपवंसामध्ये वर्णित सिंहली राजे :

सिंहलमध्ये एकुण एकसष्ठ राजांनी राज्यकार्यकिर्द गाजविलेली आहे. या राजांचे
1. उत्तर भारतीय राजे
2. दक्षिण भारतीय राजे
3. सिंहलमधील राजे
4. सिंहलमधील स्त्री राजकर्त्या
असे विभाजन आढळुन येते.

दीपवंसा मधील अराजकता शासन :

त्याचप्रकारे सिंहमध्ये दोनदा अराजकता शासन देखीलआढळुन येते.

भारत व सिंहलमधील राजांची तुलना :

भारत व सिंहलमधील राजांची तुलना केल्यास भारतामध्ये वर्णव्यवस्था व जातीभेदाचे वर्चस्व आढळते, तसे सिंहलमध्ये आढळुन येत नाही. भारतामध्ये स्त्री-पुरूषभेदभाव देखील आढळुन येतो. सिंहलमध्ये स्त्रीयांनी देखील राज्याची सुत्रे हाताळलेली आहेत. अर्थात सिंहलमध्ये स्त्री-पुरूष भेद आढळुन येत नाही.

दीपवंसामध्ये सम्राटअसोक यांनीच बौद्धधम्माला दिलेल्या योगदानाविषयी विवेचन देण्यात आलेले आहे. मात्र सिंहलमधील अत्याधिक राजे बौद्ध धम्माचा अवलंब करणारे होते. त्यामुळेबौद्धधम्माच्या प्रचार-प्रसार सिंहलमध्ये शीघ्र झाला. यासंबंधीचे माहीतीचा अंतर्भाव  दीपवंसामध्ये करण्यात आलेला आहे.

One thought on “दीपवंसामधील राजांचा इतिहास”

  1. Important information with real history of Buddhism,the Kings who spread and protected Buddhist principles around the globe. Thanks a lot to all the team. Namo Buddhay Jay Bhim.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *